ठळक घडामोडी

रावे विद्यार्थिनींकडून अझोला उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक!

कुडाळ : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत विद्यार्थिनी हर्षदा साबळे, आकांक्षा जाधव, संजीवनी पाटील व श्रावणी बाचल यांनी हुमरमळा (अणाव) गावात जैवखत अझोला उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक घेतले.
     या प्रात्यक्षिकासाठी ३ × २ × ०.३० मीटर आकाराचा खड्डा तयार करून त्यामध्ये काळ्या LDPE ताडपत्रीचा वापर करण्यात आला. त्यानंतर शिफारशीनुसार माती, शेणखत/वर्मीकंपोस्ट, सिंगल सुपर फॉस्फेट (SSP), पाणी व अझोला कल्चर यांचा वापर करून अझोला उत्पादनाची प्रक्रिया प्रत्यक्ष करून दाखविण्यात आली.
     यावेळी शेतकऱ्यांना अझोलाच्या देखभालीच्या पद्धती, काढणी व उपयोगाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जैवखत म्हणून अझोलाचे महत्त्व आणि पशुधनासाठी पौष्टिक खाद्य म्हणून त्याचा उपयोग याबाबत माहिती देण्यात आली. या प्रात्यक्षिकातून विद्यार्थिनींना अझोला उत्पादन तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.

error: Content is protected !!