
कुडाळ : रावे (RAWE) कार्यक्रमांतर्गत अणाव गावात कृषीकन्यांकडून विविध ठिकाणी वृक्षारोपण उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत गावातील विविध ठिकाणी नारळ, सुपारी, कोकम, काजू, आंबा, जास्वंद, गुलाब आदी विविध फळझाडे व शोभिवंत रोपांची लागवड करण्यात आली.
वृक्षांचे पर्यावरणीय तसेच सामाजिक महत्त्व लक्षात घेऊन गावात अधिकाधिक हिरवळ निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. वृक्षसंवर्धन व पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला. या उपक्रमात कृषीकन्या अनुजा गिते, सृष्टी राऊळ, दिया पी. व अतुल्या एम. यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.










