ठळक घडामोडी

कुडाळ शहरातील खड्डे तातडीने बुजवा, स्ट्रीट लाईट सुरू करा!

भाजपा शहराध्यक्ष सुनील बांदेकर यांचे निवेदन

कुडाळ : प्रतिनिधी
       गणेश चतुर्थीचा सण जवळ येत असल्याने कुडाळ शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत, रस्त्यालगतची झाडी साफ करावी तसेच प्रत्येक प्रभागातील बंद असलेल्या स्ट्रीट लाईट तात्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी भाजपाचे कुडाळ शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुनील बांदेकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे स्वतंत्र निवेदन सादर केले आहे.
     गणेशोत्सवाच्या काळात कुडाळ शहरात नागरिकांची व वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्ते, प्रकाश व्यवस्था आणि स्वच्छता याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे बांदेकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
कुडाळ नगरपंचायतीकडे केलेल्या मागणीनुसार, प्रत्येक प्रभागातील पोलवरील बंद असलेल्या स्ट्रीट लाईट सुरू कराव्यात. तसेच रस्त्यालगत वाढलेली झाडी साफ करावी. कन्याशाळा ते लक्ष्मी मंदिर, नाबरवाडी सर्व्हिसिंग सेंटरजवळील रस्ता तसेच एस.टी. स्टँड ते एस.टी. डेपो या मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
     दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रस्त्यांबाबतही बांदेकर यांनी निवेदन दिले आहे. कुडाळ शहरातील पोस्ट ऑफिस ते दत्तनगर तसेच पोलीस स्टेशन ते आर.एस.एन. हॉटेल या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, त्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यताही निर्माण झाली असून, गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.

error: Content is protected !!