
तुपटवाडी पुलाजवळ अपघात
कुडाळ : कुडाळ शहरातील तुपटवाडी जवळच्या पुलाजवळ आज बुधवारी रात्री एका चार चाकी कारला अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारचालकाला तेथील रस्त्यावरील गतिरोधकाचा अंदाज न आल्याने चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार तेथील पुलाजवळील लोखंडी रेलिंगला जाऊन धडकली. या घटनेची माहिती मिळताच प्रथमेश केळबाईकर, संदेश सावंत, शुभम सिंदगीकर, शैलेंद्र सावंत, गौरव माळकर, विवेक मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.










