
वीरमाता, वीरपत्नी व माजी सैनिकांचा सन्मान
कुडाळ : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी कुडाळच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी शिवापूर येथील शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवापूर पंचक्रोशीतील वीरमाता, वीरपत्नी तसेच माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन एकूण २१ जणांचा सत्कार करण्यात आला. माजी सैनिकांचाही यावेळी सन्मान करून त्यांच्या देशसेवेचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला जिल्हा भाजपा उपाध्यक्ष बंडया सावंत, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य मोहन सावंत, अभय परब, पप्या तवटे, मंडल उपाध्यक्ष राजा धुरी, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष जयेश चिंचाळकर, युवा मोर्चा कुडाळ अध्यक्ष तन्मय वालावलकर, सुरेश राऊळ, कौशल पाटकर, सरपंच सौ. शेडगे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, माजी सैनिक, वीरमाता व वीरपत्नी उपस्थित होते.










