
कुडाळ : प्रतिनिधी
मुंबई गोवा महामार्गावर पावशी येथे मालवाहक रिक्षा टेम्पोने उभ्या असलेल्या दुचाकीला धडक दिल्याची घटना आज रात्री ८.१५ च्या सुमारास घडली. यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पुढील कार्यवाही सुरू केली होती.
प्राप्त माहितीनुसार, दुचाकीस्वार बेलनदी नजिक थांबून महामार्गाच्या बाजूला उभे होते. त्यावेळी कणकवलीकडे जाणाऱ्या मालवाहक रिक्षा टेम्पोने उभ्या असलेल्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये मार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या दुचाकीला धडक देत दुचाकीस्वाराला धडक दिली. यात दुचाकीस्वार जखमी झाला. घटनास्थळी नागरिक व वाहनधारकांची गर्दी झाली होती.









