ठळक घडामोडी

बागायती पिकांमध्ये अभिवृद्धी तंत्रांचे प्रात्यक्षिक!

हुमरमळा (अणाव) येथे कृषीकन्यांचा उपक्रम

कुडाळ : रावे (RAWE) कार्यक्रमांतर्गत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी हुमरमळा (अणाव) मधील शेतकऱ्यांसाठी बागायती पिकांमधील अभिवृद्धी तंत्रांचे प्रात्यक्षिक घेतले.
     यामध्ये गुलाबामध्ये टी-बडिंग, जास्वंदामध्ये सॉफ्टवुड ग्राफ्टिंग आणि पेरूमध्ये एअर लेअरिंग या पद्धती प्रत्यक्ष करून दाखविण्यात आल्या. विद्यार्थिनींनी या तंत्रांची पद्धत, महत्त्व, फायदे तसेच घ्यावयाची काळजी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
     या प्रात्यक्षिकात हर्षदा साबळे, आकांक्षा जाधव, संजीवनी पाटील आणि श्रावणी बाचल या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. प्रात्यक्षिकामुळे शेतकऱ्यांना बागायती पिकांची शाकीय अभिवृद्धी करण्याच्या विविध पद्धतींचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले.

error: Content is protected !!