ठळक घडामोडी

नेरुरमध्ये २९ ऑगस्टला भव्य ‘नारळ लढविणे’ स्पर्धा!

रणझुंजार मित्र मंडळ व जि.प. सदस्य रुपेश पावसकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

कुडाळ : प्रतिनिधी
      रणझुंजार मित्र मंडळ आणि जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांच्या संयुक्त विद्यमाने नेरुर येथे भव्य ‘नारळ लढविणे स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे यंदा द्वितीय वर्ष असून, शनिवार दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता नेरुर चव्हाटा येथील मारुती मंदिराजवळ ही स्पर्धा रंगणार आहे.
     पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्यासोबतच ग्रामस्थांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी ६ हजार ६६६ रुपये, तर द्वितीय क्रमांकासाठी ३ हजार ३३३ रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रति संघ/स्पर्धक ३०० रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. नेरुर व परिसरातील नारळ शौकीन तसेच पारंपरिक खेळप्रेमींना या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी कल्पेश मार्गी – ८३९०६१६७६०, प्रवीण नेरुरकर – ९४२२९४८०२४ आणि संतोष परब – ७२६३००३०९७ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
नेरुर व आसपासच्या परिसरातील सर्व नागरिक आणि पारंपरिक खेळप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन रणझुंजार मित्र मंडळ आणि जि.प. सदस्य श्री. रुपेश पावसकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!