ठळक घडामोडी

अणावच्या कृषीकन्यांकडून कुडाळ एमआयडीसीला भेट!

रावे कार्यक्रमांतर्गत उद्योग कार्यपद्धतीचा केला अभ्यास

कुडाळ : रा. कृ. का. (RAWE) कार्यक्रमांतर्गत अणाव गावात कार्यरत असलेल्या छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस येथील कृषीकन्या अनुजा गिते, सृष्टी राऊळ, दिया पी. व अतुल्या एम. यांनी कुडाळ MIDC येथील माऊली ॲग्रो फूड प्रॉडक्ट्स या कृषी प्रक्रिया उद्योगाला भेट देऊन उद्योगाच्या आर्थिक व व्यावसायिक कार्यपद्धतीचा अभ्यास केला.
     भेटीदरम्यान कृषीमालाची प्रक्रिया, कच्च्या मालाची खरेदी व उपलब्धता, उत्पादन प्रक्रिया, दैनंदिन विक्री, ग्राहकांची संख्या व बाजारपेठेतील मागणी याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. तसेच वितरण व्यवस्था, आयात-निर्यात, उत्पादन खर्च, विपणन पद्धती आणि उद्योगाच्या आर्थिक बाबी समजून घेण्यात आल्या.
    कृषी उत्पादनाला प्रक्रिया व योग्य बाजारपेठ मिळाल्यास त्यातून अधिक मूल्यनिर्मिती कशी करता येते, याचा प्रत्यक्ष अनुभव या भेटीतून कृषीकन्यांना मिळाला. या भेटीमुळे कृषी प्रक्रिया उद्योगातील आर्थिक नियोजन, विपणन आणि व्यवसाय व्यवस्थापनाची व्यावहारिक माहिती मिळाली.

error: Content is protected !!