ठळक घडामोडी

गुणवत्तापूर्ण बियाणे निवडीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन!

हुमरमळा (अणाव) येथे कृषीकन्यांकडून प्रात्यक्षिक

कुडाळ : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत (RAWE) हुमरमळा (अणाव) येथे वनस्पतिशास्त्र विषयातील “बियाण्यांचे वर्ग व बियाणे टॅगचे महत्त्व” या विषयावर शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिक घेण्यात आले.
       यावेळी विद्यार्थिनींनी माहितीपूर्ण तक्ता तयार करून बियाण्यांचे विविध वर्ग, तसेच बियाणे टॅगवरील महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितली. बियाणे टॅगवरील बियाण्याचा वर्ग, शुद्धता, उगवण क्षमता, लॉट क्रमांक व इतर आवश्यक माहिती कशी तपासावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
      बियाणे खरेदी करताना टॅगवरील माहिती काळजीपूर्वक तपासून प्रमाणित व गुणवत्तापूर्ण बियाण्यांची निवड करण्याचे महत्त्व विद्यार्थिनींनी स्पष्ट केले.
      या प्रात्यक्षिकात हर्षदा साबळे, आकांक्षा जाधव, संजीवनी पाटील व श्रावणी बाचल या विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रात्यक्षिकास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

error: Content is protected !!