ठळक घडामोडी

सिंधुदुर्ग पोलिस दलातील १३ अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर!

जिल्हा पोलिस अधिक्षक डाॅ.मोहन दहिकर यांच्यासह पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान

कुडाळ पोलीस ठाण्याचे प्रमोद काळसेकर यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवा पदक जाहीर

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
       सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील तेरा अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाचे उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. यामध्ये जिल्हा पोलिस अधिक्षक डाॅ.मोहन दहिकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये कुडाळ पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार प्रमोद बाळकृष्ण काळसेकर यांचा देखील समावेश  आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस महासंचालकांकडून हि निवड जाहीर करण्यात आली आहे.
      उत्कृष्ट सेवा पदकासाठी १५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक निष्कलंक सेवा बजावलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. या यादीत सिंधुदुर्गातील पोलिस अधिक्षक डॉ. मोहन मुरलीधर दहिकर, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे निरीक्षक प्रवीण अशोक कोल्हे, कणकवली पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार राकेश रवींद्र कडुलकर, कुडाळ पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार प्रमोद बाळकृष्ण काळसेकर, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे हवालदार किरण कृष्णा देसाई व पोलीस हवालदार बस्त्याव पेढू डिसोझा आणि बाॅम्ब शोधक व नाशक पथकातील पोलीस हवालदार राहुल शिवाजी काळे यांचा समावेश आहे.
     याशिवाय अति-उत्कृष्ट सेवा पदक (२५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त निष्कलंक सेवा) या श्रेणीतही सिंधुदुर्गाशी संबंधित सहा अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला आहे. यामध्ये पोलीस उपअधीक्षक (सावंतवाडी) राजेश रमेश भागवत, रापोनि (पोलीस मुख्यालय) रामदास नागेश पालशेतकर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक (बाॅम्ब शोधक व नाशक पथक) संजय पुंडलिक साटम, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक (पोलीस मुख्यालय) वासुदेव विश्वनाथ वरवडेकर, सहायक पोलीस निरीक्षक (बाॅम्ब शोधक व नाशक पथक) भालचंद्र मोहन दामोळकर आणि सहायक पोलीस फौजदार (स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग) डॉमिनिक संतांन डिसोझा यांचा समावेश आहे.
     या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ, कर्तव्यनिष्ठ आणि निष्कलंक सेवेची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. पदक जाहीर झाल्याबद्दल सिंधुदुर्ग पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून सर्व मानकरींचे अभिनंदन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!