
मालवण : प्रतिनिधी
मालवण तालुक्यात आज नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नारळी पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना माजी आमदार,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी उपस्थिती दर्शविली. प्रथमतः वैभव नाईक यांनी समुद्राला नारळ अर्पण करत मच्छिमारांचे रक्षण करण्याची व मच्छिमारांची मच्छिमारी व्यवसायात भरभराट व्हावी अशी प्रार्थना केली.
नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आणि बंड्या सरमळकर मित्रमंडळाच्या वतीने महिलांसाठी मालवण जेटी येथे आयोजित केलेल्या नारळ लढविणे स्पर्धेचे उदघाटन माजी आमदार वैभव नाईक,पत्नी स्नेहा नाईक व माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. तदनंतर लायन्स क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेला आणि कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या वतीने महिलांसाठी आयोजित केलेल्या नारळ लढविणे स्पर्धेला वैभव नाईक यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, ज्येष्ठ शिवसैनिक,उद्योजक नितीन वाळके, सामाजिक कार्यकर्ते बंड्या सरमळकर,युवासेना तालुका समन्वयक, नगरसेवक मंदार ओरसकर,नगरसेवक तपस्वी मयेकर,नगरसेवक महेंद्र म्हाडगुत,नगरसेविका अनिता गिरकर,नंदिनी नाईक, राजवर्धन नाईक, महेश जावकर, उमेश मांजरेकर, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, महिला तालुकाप्रमुख श्वेता सावंत,उपतालुकाप्रमुख रश्मी परुळेकर,शहर संघटक राधिका मोंडकर,युवतीसेना जिल्हाप्रमुख निनाक्षी शिंदे,रूपा कुडाळकर,गौरी सावंत,स्मिता सरमळकर, माधुरी प्रभू, आकांक्षा शिरपुटे,तृप्ती मयेकर,सोनाली खोबरेकर,संजना रेडकर, युवासेना शहरप्रमुख सिद्धेश मांजरेकर, मनोज मोंडकर,अन्वय प्रभू,राहुल सावंत,सुधीर परब,प्रथमेश सरमळकर,बबन वाघ,आर्या गावकर,दिपा जावकर,योगिता गावकर,बाळा मिटकर,अक्षय रेवंडकर, फिलसू फर्नांडिस,सुरेश मर्ये, सूत्रसंचालक रोहन कदम, लारा मयेकर उपस्थित होते. दरम्यान कुडाळ मधील ठाकरे शिवसेना प्रणित रिक्षा मिरवणुकीत जिल्हाप्रमुख वैभव नाईक सहभागी झाले होते.










