
आमदार निलेश राणे यांच्या हस्ते भंगसाळ नदीपात्रात नारळ अर्पण

कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ शहरात शिवसेना (शिंदे) पक्षाने आज गुरूवारी सायंकाळी नारळीपौर्णिमेनिमित्त रिक्षा रॅली काढत भंगसाळ नदीला नारळ अर्पण करून मोठ्या उत्साहात नारळीपौर्णिमा साजरी केली. या रॅलीत आमदार निलेश राणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कुडाळ मध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही शिंदे शिवसेना (शिंदे) प्रणित रिक्षा संघटनेने रिक्षा रॅलीचे आयोजन केले होते. सिंधुदुर्गचा राजा पटांगण येथून शिवसेनेच्या या रिक्षा रॅलीला सुरुवात करण्यात आली. या रॅलीत आमदार निलेश राणे नवीन एसटी डेपो नजिक सहभागी झाले. त्यांच्या हस्ते नदीपात्रात नारळ अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जि.प.उपाध्यक्ष दादा साईल, जि.प.चे माजी अध्यक्ष संजय पडते व काका कुडाळकर, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, सभापती मिलिंद नाईक, नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, जि.प.सदस्य दिपलक्ष्मी पडते व रूपेश कानडे, युवासेना तालुकाप्रमुख सागर वालावलकर व अनिकेत तेंडोलकर, उपतालुकाप्रमुख देवेंद्र नाईक, शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे, नगरसेवक विलास कुडाळकर, अॅड.राजीव कुडाळकर, गणेश भोगटे, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, अरविंद करलकर, मंगेश चव्हाण, संजय भोगटे, चेतन पडते, चंदन कांबळी, युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके, आबा धडाम, रोहीत भोगटे, रश्मी नाईक, वैशाली पावसकर, राकेश नेमळेकर, नागेश नेमळेकर, प्रविण काणेकर, प्रसन्ना गंगावणे, आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते. दरम्यान भंगसाळ नदी किनारी नारळीपौर्णिमेचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती.










