ठळक घडामोडी

७८ वर्षीय सुनीता वारंग यांच्या डोळ्याची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया!

कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिरात मोतीबिंदूचे निदान

मिलिंद नाईक यांच्यासह रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या पुढाकारातून मोफत ऑपरेशन

कुडाळ : प्रतिनिधी
     कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त वारंगाची तुळसुली येथे मिलिंद नाईक मित्रमंडळ आणि रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचा ७८ वर्षीय सुनीता बाळकृष्ण वारंग यांना मोठा लाभ झाला. शिबिरात त्यांच्या डाव्या डोळ्याला मोतीबिंदू असल्याचे निदान झाले होते.
      या निदानानंतर सभापती मिलिंद नाईक, रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष मकरंद नाईक आणि डॉ. जयश्री केसरी यांच्या माध्यमातून सुनीता वारंग यांच्या डाव्या डोळ्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. त्यामुळे त्यांना पुन्हा दृष्टी सुधारण्यास मदत झाली आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून झालेल्या निदानानंतर पुढील उपचाराची जबाबदारी घेत गरजू ज्येष्ठ महिलेची मोफत शस्त्रक्रिया करून देण्यात आल्याने सुनीता वारंग यांच्या कुटुंबीयांनी मिलिंद नाईक, मकरंद नाईक, डॉ. जयश्री केसरी तसेच रोटरी क्लब ऑफ कुडाळचे आभार मानले.
या उपक्रमाचे तुळसुली परिसरातूनही कौतुक होत असून, वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छा न स्वीकारता गरजू नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ मिळवून देण्याचा उपक्रम राबविल्याबद्दल मिलिंद नाईक मित्रमंडळ आणि रोटरी क्लब ऑफ कुडाळचे आभार मानण्यात आले आहेत.

error: Content is protected !!