ठळक घडामोडी

कुडाळात पु.ना.गाडगीळ (पीएनजी) ज्वेलर्सचा भव्य मंगळसूत्र महोत्सव!

१३ ऑगस्ट ते १३ सप्टेंबरपर्यंत आयोजन; ग्राहकांना विशेष ऑफर्सची पर्वणी

श्रावणमासात सुवर्णसंधी; सोन्या-हिऱ्यांच्या मंगळसूत्रांवर आकर्षक ऑफर्स

कुडाळ : प्रतिनिधी
       कुडाळ हायस्कूलसमोरील पु. ना. गाडगीळ (पीएनजी) ज्वेलर्स दालनात श्रावणमासानिमित्त भव्य मंगळसूत्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १३ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी (१३ ऑगस्ट) विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडले.
     जि. प. सदस्या दीपलक्ष्मी पडते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पीएनजी ज्वेलर्सचे फ्रँचायझी ओनर संजय पिंगुळकर, अजय पिंगुळकर, शार्दुल पिंगुळकर, शुभेष पिंगुळकर, मॅनेजर गौरव खळे, मधुरा पिंगुळकर, रूणाली पिंगुळकर, समृद्धी पिंगुळकर, सानिका मदने, सचिन मदने, शीतल मोहिते, कुडाळ पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी सुप्रिया भागवत, एस. डी. कारेकर, एस. ए. म्हापसेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, ग्राहक व कर्मचारी उपस्थित होते.
पिंगुळकर परिवाराच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. पीएनजीचे मॅनेजर गौरव खळे यांनी महोत्सवाची माहिती देतानाच ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध ऑफर्सची माहिती दिली.
       सोन्याच्या मंगळसूत्रावर ५० टक्क्यांपर्यंत सूट
दि. १३ सप्टेंबरपर्यंत दररोज सकाळी १०.३० ते रात्री ८ या वेळेत हा महोत्सव सुरू राहणार आहे. महोत्सवादरम्यान सोन्याच्या मंगळसूत्राच्या घडणावळीवर ५० टक्क्यांपर्यंत, तर हिऱ्यांच्या मंगळसूत्राच्या घडणावळीवर १०० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
रक्षाबंधनानिमित्त सोन्या-चांदीच्या राख्यांसह आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणपतीसाठी लागणारे विविध प्रकारचे रेडीमेड दागिनेही दालनात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. श्रावणमासाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी विशेष ऑफर्सची पर्वणी उपलब्ध करून देण्यात आली असून, ग्राहकांनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन पीएनजी ज्वेलर्स, कुडाळच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!