ठळक घडामोडी

ओरोसजवळ मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; कारसह रेलिंग दुचाकीवर कोसळले!

चालकाचा ताबा सुटला अन् कार रेलिंगला धडकली; दुचाकीवरील दोघांसह चौघे गंभीर जखमी

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
      मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर ओरोस सावंतवाडा परिसरात आज मंगळवारी दुपारी सुमारे ३ वाजता भीषण अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने मारुती सुझुकी स्विफ्ट कार लोखंडी रेलिंगला धडकली. धडकेनंतर रेलिंगसह कार सर्व्हिस रोडवरून जाणाऱ्या दुचाकीवर कोसळल्याने दुचाकीवरील दोघांसह कारमधील दोघे असे चौघे गंभीर जखमी झाले.
     अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदतकेंद्र कसाल येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनांची पाहणी करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले असून, अधिक तपास महामार्ग पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!