
कलेश्वर विद्यामंदिर नेरूरसह विविध शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
घनश्याम परब यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना मदतीचा हात; कुणाल किनळेकरांचे नियोजन
कुडाळ : प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा संपर्क अध्यक्ष शिरीष सावंत आणि संदीप दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोरेगाव विभाग सचिव घनश्याम परब यांच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांच्या यशस्वी नियोजनातून हा उपक्रम राबविण्यात आला.
श्री कलेश्वर विद्यामंदिर, नेरूर येथे सुमारे २५० विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच नेरूर गोंधयाळे आणि आंबडपाल येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनाही वह्या वितरित करण्यात आल्या. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमामुळे पालक व विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीत प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी मनसे प्रभारी तालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, मालवण तालुकाध्यक्ष गॅरी अननसिएशन, सर्वेश ठाकूर, सुरज नेरूरकर, अजय जोशी, वल्लभ जोशी, अक्षय जोशी, उमेश परब, अनिकेत ठाकूर तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदीप (गोटू) नाईक, देवीदास नाईक, ठाकरे शिवसेना ग्रामपंचायत सदस्य समीर नाईक, प्रसाद गावडे, अमोल शृंगारे, श्रीधर नाईक आदी उपस्थित होते.










