
श्री साई कला क्रीडा मंडळाचे आयोजन; राजू गवंडे-शेखर गवंडे यांचा पुढाकार
पाटचे साईराज मांजरेकर विजेता तर मालवणचे हर्षद तळवडेकर उपविजेता
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ शहरातील श्री साई कला क्रीडा मंडळ, नाबरवाडी यांच्या वतीने आयोजित व शेखर (राजू) गवंडे आणि नगरसेविका सौ.श्रेया गवंडे पुरस्कृत सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय मर्यादित नारळ लढविणे स्पर्धा रविवारी रंगली. कुडाळ नाबरवाडी येथे आयोजित या स्पर्धेत जिद्द, ताकद आणि कोकणातील पारंपरिक खेळाची रंगत पाहायला मिळाली.
मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तालुकाप्रमुख संजय वेंगुर्लेकर, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, राजू राऊळ, बंड्या सावंत, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक निलेश परब व उदय मांजरेकर, नगरसेविका श्रेया गवंडे, आफरीन करोल, अक्षता खटावकर, ज्योती जळवी, जि.प.सदस्य रुपेश पावसकर व रूपेश कानडे, पं.स.सदस्या अर्चना बंगे, मंडळाचे अध्यक्ष राजू गवंडे, अतुल बंगे, सुनिल बांदेकर, निलेश तेंडुलकर, मुक्ती परब, आदिती सावंत, विशाखा कुलकर्णी, मंडळाचे सदस्य श्रीराम काजरेकर, पप्पू तोरसकर, नाईश नाबर, तन्मय कुणवळेकर, ओंकार राऊत, धनंजय परब, समीर गवंडे, बबली गवंडे आदींसह मान्यवर, मंडळाचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धा शुभारंभाची नारळ लढत भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांच्यात झाली. त्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. कुडाळसह जिल्हाभरातील स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.यात साईराज मांजरेकर (पाट) विजेता तर हर्षद तळवडेकर (मालवण) उपविजेता ठरला. विजेत्यांना मंडळाचे अध्यक्ष राजू गवंडे, नगरसेविका श्रेया गवंडे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. ‘जिद्द, ताकद आणि परंपरेचा संग्राम’ अशी रंगत असलेली ही नारळ लढविणे स्पर्धा रंगतदार ठरली.










