ठळक घडामोडी

ईद-ए-मिलाद, नारळी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर कुडाळात पोलिसांचे रूट मार्च!

सणांच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरात पोलिसांचे संचलन; अधिका-यांसह ५० अंमलदार सहभागी

कुडाळ : प्रतिनिधी
     आगामी साज-या होणा-या ईद-ए-मिलाद आणि नारळी पौर्णिमा सणाच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी सायंकाळी कुडाळ शहरात पोलिस प्रशासनाने रूट मार्च काढला. सणांच्या काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच नागरिकांत जनजागृती व्हावी यासाठी पोलिसांकडून हे संचलन करण्यात आले. यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, पोलीस अधिकारी आणि अंमलदार सहभागी झाले होते.
     कुडाळ पोलीस ठाणे येथून या रूट मार्चला सुरूवात झाली. पोस्ट ऑफिस चौक, गांधीचौक, बाजारपेठ मार्गे परत पोलीस ठाणे असा हा रूट मार्च काढण्यात आला. यामध्ये पोलीस उपविभागीय अधिकारी (सावंतवाडी) राजेश भागवत, कुडाळचे पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्यासह तीन पोलीस अधिकारी आणि ५० अंमलदार सहभागी झाले होते.

error: Content is protected !!