
नेरूर मधील शाळांमध्ये उपक्रम
कुडाळ : भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून नेरुर गावातील आयडीयल इंग्लिश मिडियम स्कूल, नेरूर, पूर्ण प्राथमिक शाळा नेरुर चव्हाटा, पूर्ण प्राथमिक शाळा नेरुर शिरसोस, जिल्हा परिषद शाळा नेरुर ठाकूर वाडी, जिल्हा परिषद शाळा नेरुर देसाई वाडी येथे आज विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री. रणजित देसाई, भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष श्री. चारुदत्त देसाई, भाजपा तालुका सरचिटणीस श्री. गुरु देसाई, शक्ती केंद्र प्रमुख श्री. निलेश मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य श्री. राजन नरिंग्रेकर, ग्रामपंचायत सदस्य सौ. काजल नेरुरकर, बूथ प्रमुख श्री. अक्षय देसाई तसेच बूथ प्रमुख श्री. आनंद नेरुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. उज्वला निकम यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला.यावेळी सर्व शाळांचे शिक्षक व मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आयडीयल इंग्लिश मिडियम स्कूलचे प्राचार्य श्री. सौरभ पाटकर यांनी आभार प्रदर्शन केले. शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले.










