ठळक घडामोडी

कुडाळ श्री देवी केळबाई मंदिरात १९ ऑगस्टला सात प्रहराचा सप्ताह; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन!

हरिनामाचा गजर; घटस्थापना, वारकरी भजने, दिंडी सोहळ्याचे आयोजन

भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

कुडाळ : सालाबाद प्रमाणे यावर्षीही कुडाळ – केळबाईवाडी येथील श्री देवी केळबाई मंदिरात बुधवार दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी सात प्रहराचा सप्ताह होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
     सकाळी १० वा. घटस्थापना, त्यानंतर सायं. ४ वा. पासून पारंपारीक वारकरी भजने सादर होणार आहेत. यात यशवंत बुवा श्री विठ्ठल रखुमाई हरीनाम (गिरगांव), वेताळ बांबर्डे वारकरी संप्रदाय (वेताळ बांबर्डे), कोचरा भजन मंडळ (कोचरा-मायनेवाडी), सद्‌गुरू वारकरी दिंडी भजन मंडळ, कुडाळ (बुवा विशाल राणे), श्री विठ्ठल रखुमाई प्रासादिक वारकरी भजन मंडळ (म्हापण पंचक्रोशी), माऊली प्रासादिक भजन मंडळ (किनळोस), ब्राह्मण सेवा भजन मंडळ, खवणे (पागेरेवाडी) यांची काकड आरती होणार आहे. तसेच बुधवारी सायं. ६ वा. पासून आकर्षक दिंड्यांचा कार्यक्रम होणार आहे. यात आई केळबाई बाल मित्रमंडळ (केळबाईवाडी कुडाळ), श्री केळबाई युवक मित्र मंडळ (कुडाळ) व नाबरवाडी मित्र मंडळ (कुडाळ) यांच्या दिंडी सहभागी होणार आहेत. गुरूवार दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वा. गोपाळकाला होणार आहे. या सोहळ्याला सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन, श्री देवी केळबाई उत्सव मंडळ (कुडाळ)च्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!