ठळक घडामोडी

कुडाळमध्ये १७ ऑगस्टला रक्तदान शिबिराचे आयोजन!

सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनचा पुढाकार

कुडाळ : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन यांच्या वतीने सोमवार, दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी कुडाळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सिद्धिविनायक हॉल, कुडाळ रेल्वे स्टेशन रोड, कुडाळ येथे सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत होणार आहे. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तदानाबाबत समाजामध्ये जनजागृती निर्माण व्हावी, या सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
       सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे हे पाचवे वर्ष असून, गेल्या चार वर्षांपासून संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. याच सेवाभावी परंपरेला पुढे नेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
“एक छोटा कदम, किसी की नई जिंदगी” या सेवाभावी भावनेतून युवकांसह सर्व पात्र आणि निरोगी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे. रक्तदानासाठी १८ ते ६५ वर्षे वयोगटातील, ५० किलो किंवा त्यापेक्षा अधिक वजन असलेले आणि निरोगी व्यक्ती सहभागी होऊ शकतात. तसेच मागील तीन महिन्यांत रक्तदान केलेले नसणे आवश्यक आहे. या सामाजिक उपक्रमात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदानाचे सामाजिक कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!