ठळक घडामोडी

RAWE विद्यार्थिनींची कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस येथे शैक्षणिक भेट!

सिंधुदुर्गनगरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या RAWE कार्यक्रमातील विद्यार्थिनींनी कृषी विज्ञान केंद्र (KVK), किर्लोस, सिंधुदुर्ग येथे शैक्षणिक भेट दिली. यावेळी डॉ. विलास सावंत, शास्त्रज्ञ (Extension), कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस यांनी विद्यार्थिनींचे स्वागत करून KVK चे उद्दिष्ट, महत्त्व व शेतकरी-केंद्रित विस्तार कार्याची माहिती दिली.
     भेटीदरम्यान विद्यार्थिनींनी फळ प्रक्रिया, ससा पालन, कुक्कुटपालन व शेळीपालन युनिटची पाहणी केली. तसेच फळ प्रक्रिया युनिटमध्ये आंबा पल्प, लिंबू सरबत, कोकम सरबत, आंबा पोळी आदी मूल्यवर्धित उत्पादनांची माहिती घेतली. यासोबतच 15 Drum Therapy, नैसर्गिक द्रवरूप खते, भात प्रक्षेत्र व अझोला उत्पादन याबाबत मार्गदर्शन मिळाले.
     या भेटीतून विद्यार्थिनींना KVK च्या विविध उपक्रमांसह आधुनिक कृषी तंत्रज्ञान व विस्तार कार्याचे व्यावहारिक ज्ञान मिळाले. RAWE विद्यार्थिनी हर्षदा साबळे, आकांक्षा जाधव, संजीवनी पाटील व श्रावणी बाचल उपस्थित होत्या.

error: Content is protected !!