ठळक घडामोडी

कुडाळ सभापती मिलिंद नाईकांकडून घावनळेत कोरगावकर कुटुंबियांचे सांत्वन

कुडाळ : प्रतिनिधी
     कुडाळ तालुक्यातील घावनळे-पोसवेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक पांडुरंग कोरगावकर (वय ७१) यांचे दि. ११ ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
   शिवसेना कार्यकर्ते शशांक कोरगावकर यांचे ते वडील तर यशवंत कोरगावकर यांचे काका होत. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा प्रसंग ओढवल्याची माहिती मिळाल्यानंतर कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांनी आज कोरगावकर कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत दुःखात सहभागी होत त्यांना धीर दिला. या प्रसंगी स्थानिक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!