ठळक घडामोडी

कृषीकन्यांच्या पुढाकारातून पशुधन लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन!

कुडाळ : रावे (RAWE) कार्यक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस येथील कृषिकन्या अनुजा गिते, सृष्टी राऊळ, दिया पी. व अतुल्या एम. यांच्या पुढाकाराने अणाव पंचक्रोशीतील गावांत पशुधन लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
     या कार्यक्रमात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अर्जुन सणप यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील पशुधनाला लाळ्या-खुरकूत (FMD) रोगाविरुद्ध लसीकरण करण्यात आले. यावेळी पशुपालकांना पशुधनाचे वेळेवर लसीकरण करणे, संसर्गजन्य रोगांपासून जनावरांचे संरक्षण करणे तसेच नियमित पशुवैद्यकीय तपासणीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
     लसीकरणामुळे जनावरांचे लाळ्या-खुरकूतसारख्या संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होण्यास मदत होते. तसेच रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार कमी करून पशुधनाचे आरोग्य आणि उत्पादकता टिकवून ठेवण्यास हातभार लागतो.
     या उपक्रमामुळे गावातील पशुपालकांमध्ये वेळेवर लसीकरण व योग्य पशुधन आरोग्य व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण झाली. रावे कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम पशुधनाच्या आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने उपयुक्त ठरला.

error: Content is protected !!