ठळक घडामोडी

आमदार निलेश राणे यांच्या सूचनेनंतर डाॅ. तेलंग महिला व बाल रुग्णालयात पुन्हा रूजू!

कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांनी घेतली भेट

आणखी ऑन-कॉल डाॅक्टरसाठी आ.राणेंमार्फरत पाठपुरावा करणार – सभापती

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ महिला व बाल रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने गरोदर महिला व महिला रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबतची माहिती आमदार नीलेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार वैद्यकीय रजेवर असलेल्या स्त्री रोग तज्ज्ञ डाॅ. तेलंग सोमवारी रूग्णालयात हजर झाल्या. त्यांनतर त्यांची कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांनी भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी रुग्णालयातील सेवा अधिक चांगल्या पद्धतीने सुरू राहाव्यात आणि कुडाळ तालुक्यातील महिलांना आवश्यक वैद्यकीय सेवा स्थानिक पातळीवरच उपलब्ध व्हाव्यात, याबाबत चर्चा करण्यात आली.
      या रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञांची उपलब्धता सातत्याने राहावी, यासाठी येत्या काही दिवसांत आणखी काही ऑन-कॉल स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून देण्याबाबत आमदार नीलेश राणे यांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात येईल, असे यावेळी सभापती मिलिंद नाईक यांच्याकडून रुग्णालय प्रशासनाला सांगण्यात आले. महिलांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यासाठी आमदार राणे यांच्या माध्यमातून आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाहीही देण्यात आली. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष काका कुडाळकर, पं.स.सदस्य निखिल कांदळगावकर व बाळू मडव, विनायक अणावकर, अधिक्षक डॉ. वाळके व डाॅ. तेलंग उपस्थित होते. डाॅ.तेलंग रूजू झाल्यामुळे महिला रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

error: Content is protected !!