ठळक घडामोडी

कुडाळ शहरातील मुख्य रस्त्यावरून मोटरसायल चोरीस!

भरदिवसा घडलेल्या घटनेने शहरात खळबळ; घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद

मोटरसायकलस्वाराची पोलिसांत धाव; पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ शहरातील सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या शहर शाखा परिसरातील मुख्य रस्त्यावरून आज सोमवारी सकाळी ८.१५ ते ८.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने मोटारसायकल पळवून नेल्याची घटना घडली. भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या चोरीमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
      मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जुन्या गीता हाॅटेल नजिकच्या मुख्य रस्त्यावर ही घटना घडली. फुले खरेदी करण्यासाठी आलेल्या युवकाने मोटारसायकल फुलांच्या दुकानासमोर उभी करून तो दुकानात गेला. याच संधीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने मोटारसायकल चालू करून बसस्थानकाच्या दिशेने पोबारा केला. ही घटना नजीकच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मोटारसायकलधारक व नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला; मात्र मोटारसायकलचा ठावठिकाणा लागला नाही. याबाबत कुडाळ पोलिसांना माहिती देण्यात आली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मोटारसायकल व चोरट्याचा शोध घेण्यासह पुढील कार्यवाही पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे.

error: Content is protected !!