ठळक घडामोडी

हिर्लोक येथे शेतात तुटून पडलेल्या वीजतारेच्या स्पर्शाने गाभण गाय, म्हैस मृत्युमुखी!

मुलगा सुदैवाने बचावला; शेतकऱ्याचे दोन लाखांचे नुकसान

महावितरणने भरीव नुकसानभरपाई द्यावी; सरपंच प्राची सावंत यांची मागणी

कुडाळ : हिर्लोक-भटवाडी येथे आज सकाळी सव्वानऊच्या सुमारास शेतात वीजवाहिनी तुटून पडल्याने तिचा स्पर्श होऊन गाभण गाय व म्हैस अशी दोन जनावरे जागीच गतप्राण झाली. जनावरांना चारण्यासाठी गेलेला शेतकरी गणेश शिवराम परब यांचा मुलगा पियूष याने प्रसंगावधान राखल्याने तो सुदैवाने बचावला. या घटनेत परब यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच सरपंच सौ.प्राची सावंत, उपसरपंच नरेंद्र राणे, पोलीसपाटील दीपक कदम, ग्राम महसूल अधिकारी संतोष बांदेकर तसेच महावितरणचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्रशासकीय यंत्रणेकडून पंचनामा करण्यात आला. महावितरणने शेतकऱ्याला भरीव नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच प्राची सावंत यांनी केली आहे.

error: Content is protected !!