ठळक घडामोडी

कुडाळात गॅरेजला अचानक आग; साहित्य जळून खाक!

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ शहरातील अनंत मुक्ताईसमोरील सुलभ शौचालयाजवळील दुचाकी दुरुस्तीच्या गॅरेजला सोमवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास अचानक आग लागली. संजय सोमा सावंत यांच्या बंद गॅरेजला लागलेल्या आगीत दुरुस्तीचे साहित्य जळून मोठे नुकसान झाले.
      घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, मुख्याधिकारी खंडू पवळ, नगरसेवक विलास कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, श्रीराम शिरसाट यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

error: Content is protected !!