ठळक घडामोडी

सावंतवाडीत बूथ क्र. १५१ वर ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन!

भाजपा युवा नेते विशाल परब यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ला सावंतवाडीत भाजप कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी : बूथ क्रमांक १५१ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण करण्यात आले. यावेळी भाजपा युवा नेते विशाल परब, सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, माजी नगरसेवक विलास जाधव, सोशल मीडिया प्रमुख केतन आजगांवकर, भाजपा युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गौरव जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
      यावेळी बूथ अध्यक्ष सचिन माडये, माजी बूथ अध्यक्ष भूषण नाईक, स्वप्नील जाधव, बाबूराव तेली तसेच अन्य भाजपा कार्यकर्त्यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनातून देशातील विविध क्षेत्रांतील सकारात्मक उपक्रम आणि नागरिकांच्या सहभागातून घडणाऱ्या प्रेरणादायी कार्याची माहिती यावेळी उपस्थितांनी जाणून घेतली. कार्यक्रमानंतर उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघटनात्मक कामकाज आणि आगामी उपक्रमांबाबत चर्चा केली.

error: Content is protected !!