ठळक घडामोडी

कुडाळ येथे आगीत गॅरेजचे मोठे नुकसान; शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडेंचा मदतीचा हात!

उपजिल्हाप्रमुख ओंकार तेलींसह नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्याकडूनही आर्थिक सहाय्य

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ शहरातील अनंत मुक्ताईसमोरील सुलभ शौचालयाजवळील एका दुचाकी दुरुस्तीच्या गॅरेजला सोमवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास अचानक आग लागली. संजय सावंत यांच्या बंद गॅरेजला लागलेल्या आगीत दुरुस्तीचे साहित्य जळून मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष ओंकार तेली आणि शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांनी घटनास्थळी धाव घेत, गॅरेज मालक श्री.सावंत यांना आर्थिक स्वरूपात मदत देत सामाजिक बांधीलकी जोपासली.

error: Content is protected !!