ठळक घडामोडी

घरगुती LPG रिफिल बुकिंगसाठी आता ग्रामीण व शहरी भागात 25 दिवसांचे अंतर!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुधारित निर्देशांची तात्काळ अंमलबजावणी

सिंधुदुर्गनगरी : केंद्र शासनाच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडील दि. 7 सप्टेंबर 2026 रोजीच्या निर्देशानुसार घरगुती LPG रिफिल बुकिंगसंदर्भात सुधारित निर्देश जारी करण्यात आले आहेत.
     त्यानुसार, घरगुती LPG ग्राहकांसाठी Inter-Refill Booking Gap चा कालावधी ग्रामीण व शहरी क्षेत्रांसाठी समानपणे 25 दिवस करण्यात आला आहे. यापूर्वी ग्रामीण क्षेत्रासाठी हा कालावधी 45 दिवस, तर शहरी क्षेत्रासाठी 25 दिवस होता. आता ग्रामीण क्षेत्रासाठीही हा कालावधी 25 दिवस करण्यात आला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी क्षेत्रातील सर्व घरगुती LPG ग्राहकांना मागील LPG रिफिलच्या तारखेपासून 25 दिवसांचे निर्धारित अंतर पूर्ण झाल्यानंतरच पुढील LPG रिफिलचे बुकिंग करता येणार आहे.
      सुधारित निर्देशांची तात्काळ प्रभावाने अंमलबजावणी करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व LPG वितरक व गॅस एजन्सींना निर्देश देण्यात आले आहेत. तरी, जिल्ह्यातील सर्व घरगुती LPG ग्राहकांनी या सुधारित बदलाची नोंद घेऊन मागील रिफिलच्या तारखेपासून 25 दिवसांचे अंतर पूर्ण झाल्यानंतरच पुढील LPG रिफिलचे बुकिंग करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी केले आहे.

error: Content is protected !!