ठळक घडामोडी

तिकीट ब्लॉकचा तुटवडा; कुडाळ एसटी आगाराची बससेवा ४ तास ठप्प!

NCMC पावतीवरील प्रवासासाठी ५ व ३ रुपयांचे कॉम्बिनेशन तिकीट उपलब्ध नाही

बससेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल; तोडग्यासाठी प्रशासन-एसटी कामगार संघटनेत चर्चा

कुडाळ : कुडाळ एसटी आगारात NCMC कार्ड नोंदणी रिसीट असलेल्या प्रवाशांसाठी आवश्यक असलेले महिला सन्मान योजनेचे ५ व ३ रुपयांचे कॉम्बिनेशन तिकीट ब्लॉक उपलब्ध नसल्याने आज सकाळी ११.३० वाजल्यापासून एसटीच्या अनेक फेऱ्या ठप्प झाल्या. प्रशासनाकडून तोडगा काढण्यात आल्यानंतर चार तासांनी बससेवा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू होते.
      महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिली जाते. NCMC नोंदणी पावतीवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देणारे देणारा तिकिट ऑप्शन मशीन मधून काढून टाकत मॅन्यूअल तिकिट ट्रे मधून तिकिटे देण्याचा निर्णय एसटी प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. मात्र या ५ व ३ रुपयांचे कॉम्बिनेशन तिकीटांचे ब्लॉक उपलब्ध नसल्याने वाहकांना नियमानुसार तिकीट देण्यात अडचण निर्माण झाली आणि परिणामी बसफेऱ्या थांबवण्यात आल्या.
अचानक सेवा बंद झाल्याने कुडाळ बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून विद्यार्थी, चाकरमानी, ग्रामीण भागातील प्रवासी व ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले. दरम्यान, एसटी कामगार संघटनेचे प्रतिनिधी आणि आगार प्रशासनाकडून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. दरम्यान याबाबत तोडगा काढण्यात आल्या असून गाड्या मार्गस्थ झाल्याची माहीती आगार प्रशासनाकडून देण्यात आली.

error: Content is protected !!