ठळक घडामोडी

साळगावातील मनसेच्या युवा कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश!

कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांच्या उपस्थितीत हरी सावंत यांचा प्रवेश

कुडाळ : साळगाव येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) युवा कार्यकर्ते हरी सावंत यांनी कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. कुडाळचे सभापती मिलिंद नाईक यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी सभापती मिलिंद नाईक यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
     आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ-मालवण मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांना तसेच पक्षाच्या संघटनात्मक कार्याला बळ देण्यासाठी आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचे हरी सावंत यांनी सांगितले. त्यांच्या प्रवेशामुळे साळगाव परिसरातील शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!