ठळक घडामोडी

पालकमंत्री नितेश राणे उद्या रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर!

भातशेती पिक परिस्थितीची पाहणी; जिल्हाधिकारी कार्यालयात संभाव्य दुष्काळ परिस्थितीचा घेणार आढावा

सिंधुदुर्ग : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना.नितेश राणे उद्या रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे.
      सकाळी ०९.०० वा. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा, गोवा येथून मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण, सकाळी १०.३० वा. मळेवाड येथील भातशेती पिक परिस्थितीची पाहणी. स्थळ : मळगाव ता. सावंतवाडी. सकाळी ११.०० वा. होडावडा येथील भातशेती पिक परिस्थितीची पाहणी, स्थळ : होडावडा ता. वेंगुर्ला. दुपारी १२.०० वा. संभाव्य दुष्काळ परिस्थितीचा आढावा बैठकीस उपस्थिती.स्थळ : सिंधुनिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग, दुपारी ०३.३० वा. बेळणेखुर्द येथील भातशेती पिक परिस्थितीची पाहणी, स्थळ : बेळणेखुर्द ता. कणकवली. सायं ०४.३० वा. शिरगाव, शेवरे तांबळवाडी येथील भातशेती पिक परिस्थितीची पाहणी, स्थळ : शिरगाव, शेवरे ता. देवगड आणि सायं ०५.३० वा. नाधवडे येथील भातशेती पिक परिस्थितीची पाहणी, स्थळ : नाधवडे ता. वैभववाडी.

error: Content is protected !!