ठळक घडामोडी

पणदूर येथे मुंबई-गोवा महामार्गावर अपघात!

कार समोर बैल आडवा आल्याने अपघात; बैल ठार

जि.प.उपाध्यक्ष दादा साईल यांच्यासह ग्रामस्थांकडून मदतकार्य

कुडाळ : प्रतिनिधी
      मुंबई गोवा महामार्गावर पणदूर ब्रिज नजिक अचानक कार समोर बैल आल्याने ओरोसच्या दिशेने जाणा-या कारला मोठा अपघात झाला. या अपघातात बैलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली.
     घटनेची माहीती मिळताच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दादा साईल यांच्यासह प्रसाद गावडे, राजेश टंगसाळी, पोलिस पाटील देऊ सावंत, महेश कदम, नारायण (बाबू) सावंत व ग्रामस्थांनी धाव घेत मदतकार्य केले. ग्रामस्थांच्या सहकार्याने मृत बैलाचे दफन करण्यात आले. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून, कारमधील कोणालाही दुखापत झाली नाही.

error: Content is protected !!