ठळक घडामोडी

कुडाळात भाजी विक्रेता महिलांना युवासेनेकडून मोठ्या छत्र्यांचे वाटप!

आमदार निलेश राणेंच्या माध्यमातून युवासेनेचा उपक्रम

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ पोलिस ठाणे ते बाजारपेठ परिसरातील रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्या महिला विक्रेत्यांना पावसाळ्यात तसेच उन्हाळ्यात होणारी गैरसोय लक्षात घेऊन युवासेना (शिंदे) कुडाळ तालुक्याच्या वतीने मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
      रस्त्याच्या कडेला भाजी विक्री करणाऱ्या महिलांना पावसात भिजत तसेच उन्हात बसून व्यवसाय करावा लागतो. त्यामुळे त्यांना मोठ्या छत्र्यांची आवश्यकता होती. ही गरज लक्षात घेऊन युवासेनेने छत्र्यांचे वाटप केले. छत्र्या मिळाल्याने महिला भाजी विक्रेत्यांनी समाधान व्यक्त करत आमदार निलेश राणे यांचे आभार मानले.
       यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सरूप वाळके, युवासेना तालुकाप्रमुख सागर वालावलकर, अनिकेत तेंडोलकर, उपतालुकाप्रमुख विश्वास पांगुळ, अवधूत सामंत, प्रसाद मठकर, विनोद सावंत, समीर परब, सद्गुरू घावणळकर, कुमार राठोड यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महिला भगिनींच्या अडचणी समजून घेत त्यांना प्रत्यक्ष मदत मिळवून देणे, हीच युवासेनेची सामाजिक बांधिलकी असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

error: Content is protected !!