

चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटीचे विशेष नियोजन; प्रशासनाची माहीती

कुडाळ : गौरी गणपती सणासाठी मुंबईहून गावी कोकणात दाखल होणा-या मुंबईकर चाकरमानी गणेशभक्तांच्या सेवेसाठी राज्य परिवहन महामंडळ (एसटी) ने ज्यादा बसफे-यांचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी कुडाळ एसटी आगारातून 15 बसेस ठाणे (मुंबई)ला पाठविण्यात येणार असून, चालक – वाहक कमतरता व वाहन कमतरता असल्याने दि.9 ते 14 सप्टेंबर या कालावधीत कुडाळ एसटी आगाराच्या 57 मार्गावरील नियोजित बसफे-या तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहीती आगार प्रमुख रोहित नाईक यांनी दिली. तसेच प्रवाशांनी एसटी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.











