ठळक घडामोडी

कुडाळ येथे श्री लक्ष्मीनारायण पेट्रोलियम आयोजित इंडियन ऑईल ड्रायव्हर्स डे उत्साहात संपन्न!

आमदार किरण सामंत यांची उपस्थिती; ड्रायव्हर बांधवांचा सन्मान

कुडाळ : श्री लक्ष्मीनारायण पेट्रोलियम, कुडाळ यांच्या वतीने आयोजित इंडियनऑईल ड्रायव्हर्स डे कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला राजापूर–लांजा–साखरपा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री. किरण उर्फ भैया सामंत यांची अध्यक्षीय उपस्थिती लाभली.
      यावेळी आमदार किरण सामंत यांनी श्री लक्ष्मीनारायण पेट्रोलियमच्या ५० वर्षांच्या यशस्वी वाटचालीबद्दल देसाई कुटुंबीयांचे मनःपूर्वक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तीन पिढ्यांपासून ही सेवा सुरू असून, आज तिसरी पिढीही या व्यवसायात कार्यरत असल्याबद्दल त्यांनी देसाई कुटुंबीयांचे कौतुक केले.
       ड्रायव्हर्स डे निमित्त बोलताना आमदार किरण सामंत यांनी आपल्या वाहनावर २५ वर्षे सेवा बजावलेल्या ड्रायव्हरची आठवण सांगितली. कोविड काळात त्यांचे निधन झाल्याचे त्यांनी नमूद केले. ड्रायव्हर बांधवांनी वाहन चालविताना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे तसेच स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच ड्रायव्हर्स डे कार्यक्रमाला आणि श्री लक्ष्मीनारायण पेट्रोलियमच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
      इंडियनऑईलचे सहकार्य कायम राहील : मधुरेंद्र पांडे
       यावेळी इंडियनऑईलचे गोवा डिव्हिजन रिटेल सेल्स हेड श्री. मधुरेंद्र पांडे यांनी श्री लक्ष्मीनारायण पेट्रोलियमच्या वतीने आयोजित या उपक्रमाचे कौतुक केले. इंडियनऑईलकडून अशा उपक्रमांना नेहमीच सहकार्य केले जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. ड्रायव्हर बांधवांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी श्री लक्ष्मीनारायण पेट्रोलियमचे आभार मानले. तसेच पेट्रोलियम व्यवसायातील ५० वर्षांच्या यशस्वी वाटचालीबद्दल देसाई कुटुंबीयांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
       मान्यवरांची उपस्थिती
      कार्यक्रमाला श्री. अविनाश देसाई, श्री. ओंकार देसाई, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (ARTO) सिंधुदुर्ग श्री. आशिष लोकरे, श्री. प्रफुल्ल वालावलकर, श्री. मनोज वालावलकर, इंडियनऑईल सेल्स ऑफिसर श्री. रोहित कामळे, श्री. राजन भोबाटे, श्री. अशोक कांदळगावकर, श्री. शरद वालावलकर, श्री. शिवाजी घोगळे, श्री. भाऊसाहेब भोगळे यांच्यासह श्री. विशाल देसाई, श्री. विनय सामंत, श्री. ऋत्विक सामंत, श्री. सुजय सामंत, डॉ. प्रणव प्रभू, माननीय वर्धन तसेच ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील मान्यवर आणि ड्रायव्हर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      ड्रायव्हर बांधवांचा सन्मान
      यावेळी ड्रायव्हर बांधवांना सन्मानपूर्वक प्रशस्तीपत्रक तसेच श्री लक्ष्मीनारायण पेट्रोलियमच्या वतीने भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. ड्रायव्हर बांधवांच्या मेहनतीचे, समर्पणाचे आणि वाहतूक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाचे यावेळी कौतुक करण्यात आले.
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रफुल्ल वालावलकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. मनोज वालावलकर यांनी केले. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमातून ड्रायव्हर बांधवांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

error: Content is protected !!