

कुडाळचे माजी नगरसेवक सचिन काळप यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा
पणदूरच्या संविता आश्रमाला जीवनावश्यक साहित्य भेट
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळमधील माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते देवानंद उर्फ सचिन काळप यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवत साजरा केला. वाढदिवसानिमित्त त्यांनी पणदूर येथील संविता आश्रमाला जीवनावश्यक साहित्य भेट देत सामाजिक बांधिलकी जपली.
वाढदिवसानिमित्त आश्रमातील गरजूंसाठी आवश्यक असलेले साहित्य देण्यात आले. या उपक्रमातून समाजातील गरजू घटकांसाठी मदतीचा हात पुढे करत वाढदिवसाला सामाजिक कार्याची जोड देण्यात आली. यावेळी शैलेश काळप, पप्पू धुरी, हर्षद काळप, सिद्धेश काळप, संतोष कुडाळकर, उमेश आंगणे, अमोल उमळकर, पोलीस पाटील देऊ सावंत आदी उपस्थित होते. काळप यांच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. वाढदिवसाचा आनंद सामाजिक बांधिलकीतून साजरा करण्याचा हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला.









