ठळक घडामोडी

सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव अजय शिंदे यांची महाराष्ट्र राज्य संघ व्यवस्थापकपदी निवड!

विजयवाडा येथे होणाऱ्या ५१ व्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी मान

जिल्ह्यातून आणि क्रीडा वर्तुळातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव

मालवण : महेश कदम
     सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव अजय मधुकर शिंदे यांची मुलांच्या महाराष्ट्र राज्य सब-ज्युनिअर बास्केटबॉल संघाच्या ‘संघ व्यवस्थापक’ (मॅनेजर) पदी निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय निवडीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
     आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे दिनांक २७ सप्टेंबर २०२६ ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ५१ व्या राष्ट्रीय सब-ज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रतिष्ठित राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या व्यवस्थापनाची महत्त्वाची जबाबदारी अजय शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल आणि निवडीबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ ,कार्याध्यक्ष विजय मागाडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघ या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
     अजय शिंदे यांच्या या निवडीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचा मान राष्ट्रीय पातळीवर उंचावला असून, जिल्हाभरातील क्रीडाप्रेमी, पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर कौतुकाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!