ठळक घडामोडी

जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डेच्या टी-शर्टचे दिमाखात अनावरण!

आनंद शिरवलकर यांची प्रमुख उपस्थिती

कुडाळ : जय वेतोबा कला-क्रीडा मंडळ, वेताळ बांबर्डे (ता. कुडाळ) यांच्या जय वेतोबा गोविंदा पथकाच्या टी-शर्टचे अनावरण सोहळा बुधवारी उत्साहात पार पडला. युवा उद्योजक तथा वेताळ बांबर्डे गावचे सुपुत्र आनंद शिरवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
     यावेळी उद्योजक शैलेश बांबर्डेकर, जितेंद्र सावंत, उद्योजक प्रमोद गावडे, उपसरपंच शैलेश घाटकर, रामदास गावडे, आबा घाडी, सुहास गावडे, स्नेहा दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
     जिल्ह्यातील आघाडीचे गोविंदा पथक म्हणून ओळख असलेल्या जय वेतोबा गोविंदा पथकाने गेल्या १० ते १२ वर्षांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दहीहंडी स्पर्धांमध्ये तब्बल ६ थर रचून या पथकाने जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम व मदतकार्यही या पथकाकडून राबविण्यात आले आहे.
यावेळी आनंद शिरवलकर यांच्या हस्ते प्रतिकात्मक हंडी फोडून त्यानंतर गोविंदा पथकाच्या टी-शर्टचे अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना आनंद शिरवलकर म्हणाले, “जय वेतोबा गोविंदा पथकाने आपल्या साहसी खेळातून जिल्ह्यात कायमस्वरूपी ठसा उमटविला आहे. या पथकाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहणार असून भविष्यातही सर्वोतोपरी सहकार्य करू.” या कार्यक्रमाला वेताळ बांबर्डे येथील नागरिक तसेच पुरुष व महिला दहीहंडी पथकातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!