

अनेक वर्षांची मागणी पूर्ण; रवळनाथ मंदिर परिसर उजळला
दोन ठिकाणी सोलार हायमास्ट सुरू; ग्रामस्थांनी मानले आ.निलेश राणेंचे आभार
कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना जनसुविधा सन २०२५-२६ अंतर्गत भडगाव खुर्द देऊळवाडी रवळनाथ मंदिर येथे सोलार हायमास्ट उभारण्यात आला असून एकूण ३ लाख रुपयांचा निधी हा हायमास्टसाठी मंजूर करण्यात आला होता. भडगाव खुर्द मायंदेश्वर स्थळ व भडगाव खुर्द रवळनाथ मंदिर येथे हायमास्ट उभारण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. या दोन्ही ठिकाणी सोलार हायमास्ट कार्यान्वित करून आमदार निलेश राणे यांनी भडगाव खुर्द ग्रामस्थांची मागणी पूर्ण केली आहे. याबद्दल भडगाव माजी सरपंच विजय माळकर, माजी उपसरपंच अंकिता सावंत, शिवसेनेचे अमित गुरव, शैलेश गुरव, महेश मेस्त्री, धिरज कदम, शंतनू कदम आदींसह भडगाव खुर्द ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.









