ठळक घडामोडी

बांव येथे रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

श्री देवी सातेरी कला क्रीडा शैक्षणिक मंडळाचे आयोजन

कुडाळ : प्रतिनिधी
      रक्तदान हे श्रेष्ठदान असून, आपल्या रक्तदानामुळे गरजू रुग्णाला जीवनदान मिळू शकते, या सामाजिक भावनेतून श्री देवी सातेरी कला क्रीडा शैक्षणिक मंडळ, बांव यांच्या वतीने ग्रामपंचायत हॉल, बांव येथे आज आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे यंदाचे १७ वे वर्ष आहे.
     या शिबिराला जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल, कुडाळचे सभापती मिलिंद नाईक, जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर व रूपेश कानडे, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य पप्या तवटे, पंचायत समिती सदस्या करुणा पावसकर, बांबुळी सरपंच प्रशांत परब यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. तसेच सभापती मिलिंद नाईक यांच्यासह अनेक मान्यवर तसेच रक्तदात्यांनी रक्तदान केले.
      यावेळी सरपंच अनंत आसोलकर, अरविंद करलकर, पावशी विभाग प्रमुख नागेश परब, उमेश वेंगुर्लेकर, सुनील वेंगुर्लेकर, लक्ष्मण नेवाळकर, पोलीस पाटील आर्या कदम, सोनवडे उपसरपंच सुधीर धुरी, बांव ग्रामपंचायत अधिकारी नरेश एडगे, मंदार कोठावळे तसेच मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रघुनाथ परब उपस्थित होते.
       तसेच राजेंद्र परब, अविनाश परब, निलेश परब, कैलास परब, गणपत परब, धोंडुराज परब, संतोष मेस्त्री, रामचंद्र परब, सत्यवान परब, नारायण परब, प्रदीप परब, गुरुनाथ परब, दशरथ परब, दत्तात्रय परब, विराज बांवकर, गोविंद आसोलकर, सुदर्शन भाटकर, सुरेंद्रनाथ भाटकर, विनोद परब व ग्रामस्थ उपस्थित होते. मंडळाच्या वतीने गेल्या १७ वर्षांपासून सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून, या सामाजिक उपक्रमातून गरजू रुग्णांना रक्ताची उपलब्धता होण्यास मदत होत आहे.

error: Content is protected !!