ठळक घडामोडी

कुडाळमधील शाळांना राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या भेटी!

‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; शैक्षणिक प्रगतीचे केले कौतुक

कुडाळ : प्रतिनिधी
       ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज कुडाळ तालुक्यातील विविध शाळांना भेटी देत विद्यार्थी, संस्था पदाधिकारी व शाळा प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शाळांमधील शैक्षणिक उपक्रम व विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती घेत कौतुक केले.
        यावेळी जि.प. उपाध्यक्ष दादा साईल, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासुर, कुडाळ सभापती मिलिंद नाईक, काका कुडाळकर, संजय पडते, दिपलक्ष्मी पडते, रूपेश कानडे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.
      तसेच कुडाळ हायस्कूल संस्था पदाधिकारी अरविंद शिरसाट, का.आ.सामंत, आनंद वैद्य, बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेत संस्था चेअरमन उमेश गाळवणकर यांनी मंत्री दादा भुसे यांचे स्वागत केले. पडतेवाडी शाळा, कुडाळ हायस्कूल, बॅ.नाथ पै शिक्षण संस्था एमआयडीसी, पाट हायस्कूल व पावशी शाळा आदी ठिकाणी या शाळा भेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

error: Content is protected !!