

वैष्णवी परब, कीर्ती सुलोकर, संजाली मालवणकर अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ पंचायत समिती आयोजित रानभाजी व पाककला स्पर्धा महोत्सवाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत आरोग्य विभागाच्या वैष्णवी विष्णू परब यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी खराशींग या रानभाजीपासून पदार्थ सादर केला.
या प्रदर्शनात ५१ प्रकारच्या विविध रानभाज्या तसेच १५० हून अधिक पाककलाकृतींचे स्टॉल्स लावण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात ओरोस येथील बचत गटाच्या कीर्ती प्रविण सुलोकर यांनी अळूचे पदार्थ सादर करत द्वितीय क्रमांक मिळविला. पणदूर येथील बचत गटाच्या संजाली संजय मालवणकर यांनी टायकळा या पदार्थासाठी तृतीय क्रमांक मिळविला. उत्तेजनार्थ क्रमांकामध्ये वैशाली वसंत खरवडे (माणगाव – बचतगट) – टाकळा पदार्थ, गौरी चव्हाण (कसाल-बचत गट) – शेवगा, दिपा दिपक राऊळ (कुडाळ – आरोग्य विभाग) – शेवगा ज्युसवडी, आशावरी ज्ञानदेव बिरमोळे (तुळसुली कर्याद नारूर – बचतगट ) – शतावरी हलवा आणि आदिती अनंत तेंडोलकर (तेंडोली – अंगणवाडी) – लाजाळूचे सरबत यांची निवड झाली आहे. विजेत्यांचे सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सिताराम तेली व गटविकास अधिकारी प्रविण हिर्लेकर यांनी अभिनंदन केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विस्तार अधिकारी सोनिया पालव व संदेश परब यांच्यासह अधिका-यांनी मेहनत घेतली.









