

शिवसेना विभागप्रमुख दिलीप निचम आणि शाखाप्रमुख निलेश खानोलकर यांचा पुढाकार
कुडाळ : पिंगुळी, मांडकुली व तुळसुली या गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. या रस्त्यावरून मांडकुली, तुळसुली, केरवडे, घावनळे आदी गावांतील नागरिकांची मोठ्या प्रमाणात रहदारी असते. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
ही बाब लक्षात घेऊन शिवसेना पिंगुळी विभागप्रमुख दिलीप निचम व मांडकुली शाखाप्रमुख निलेश खानोलकर यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम करून दिले.
या कामासाठी प्रसाद वारंग, श्रीपाद सामंत, ओमकार अनसुरकर, मुकुंद मोर्ये, दिलीप गावकर, रुपेश सावंत, गुरुनाथ लाड व मयूर नाईक यांनी सहकार्य केले. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकीतून करण्यात आलेल्या या कामाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.









