

संध्या तेरसे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून विशेष बाब म्हणून पर्यटन विकास सुविधेंतर्गत मंजूर झालेल्या सुशोभीत पथदीपांचे हिंदू कॉलनी येथे बसविण्यात आले. माजी नगरसेविका संध्या तेरसे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित असलेले काम तातडीने पूर्ण होऊन पथदीप सुरू झाल्याने हिंदू कॉलनीतील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.
या कामाचा शुभारंभ श्री साईबाबांच्या चरणी श्रीफळ व पेढे अर्पण करून रहिवाशांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी श्रीधर गोरे, संजय आठले, भास्कर येळेकर, प्रसाद तेरसे, सतीश वर्दम, प्रताप खामकर, रुपेश कावळे, प्रकाश तेरसे, दीप्ती प्रभू, उमा येळेकर, स्वप्नाली साळगावकर, मंगेश शिरोडकर तसेच हिंदू कॉलनीतील रहिवासी उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले पथदीपांचे काम तातडीने पूर्ण करून लाईट सुरू केल्याबद्दल रहिवाशांनी पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे तसेच नगरसेविका संध्या तेरसे यांचे आभार मानले.









