

११ दिवस भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव; भाविकांना दर्शनाचे आवाहन
कुडाळ : प्रतिनिधी
भक्तिभाव, उत्साह आणि मंगलमय वातावरणात भाजप युवा नेते विशाल परब यांच्या कुडाळ तालुक्यातील मूळगावी वाडोस येथील निवासस्थानी आज श्री गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. गणरायाच्या आगमनाने परब कुटुंबीयांच्या निवासस्थानी भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
श्री गणरायाचे विधिवत पूजन करून गणेशोत्सवाला सुरुवात करण्यात आली. यंदा ११ दिवस श्री गणरायाचे भक्तिभावाने पूजन करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व भाविक भक्तांनी वाडोस येथील निवासस्थानी श्री गणरायाचे दर्शन घेऊन बाप्पांचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन विशाल परब यांच्या कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.









