

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात रविवारी सायंकाळी सात दिवसांच्या गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत, बाप्पाचा जयघोष करीत आणि भक्तिमय वातावरणात बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.
शहरांसह ग्रामीण भागात ढोल ताशांच्या गजरात बाप्पांना निरोप देण्यात आला. काही ठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. आठही तालुक्यात ठिकठिकाणी गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. समुद्रकिनारे, नदी, तलाव, ओहोळ आदी ठिकठिकाणी विसर्जन करण्यात आले. शहरासह ठिकठिकाणी पोलिसांकडून बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. विसर्जन निमित्ताने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.









